नेकनूर -घराच्या पाठीमागे शौचास गेलेल्या एका १३ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो काढत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलगाव येथे घडली. पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलगाव येथील एक १३ वर्षीय मुलगी शौचास गेली असता गावातीलच विशाल शरद शेळके या तरुणाने सदरील मुलीचे अश्लील फोटो काढत तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणास सांगू नको म्हणून मारहाण करत धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडितेने नेकनूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी शेळके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक त्रिभुवन, उपनिरीक्षक विलास जाधव हे करीत आहेत.
बातमी शेअर करा