Advertisement

बंडखोरांना इकडे यावंच लागेल-शरद पवार

प्रजापत्र | Thursday, 23/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई-एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच आहे, अजित पवारांना त्याची जास्त माहिती नसेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल आणि महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल असही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी हे वक्तव्य केलं. 

 

शरद पवार म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांना इथली स्थानिक माहिती आहे, पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहित आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यानुसार देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यांच्यामागे हात आहे का याचा विचार करावा. गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नाही, ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती आहे."

Advertisement

Advertisement