Advertisement

एकनाथ शिंदे जाणार भाजपसोबत !

प्रजापत्र | Thursday, 23/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई-शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता देशातील मोठा राजकीय पक्ष आपल्या सोबत आहे. ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत, आपला निर्णय योग्य आणि ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले असून आमदारांनो आता फक्त एकजूट ठेवा. विजय आपलाच आहे असे स्पष्ट करीत भाजपसोबत जाण्याचा आपला पक्का इरादा असल्याचेच आज संकेत दिले आहेत.

 

गुवाहटीत चाळीसपेक्षा जास्त आमदारांच्या गटासोबत शिवसेनेचे बंडखोर ने्ते एकनाथ शिंदे हाॅटेल रेडीसन ब्लु येथे ठाण मांडून आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपसोबत जाण्याचीच भाषा केली आहे.

 

 

काय म्हणाले शिंदे?
शिंदे यांनी आमदारांना संबोधित करताना सांगितले की, ''आता आपले सुख आणि दुःख एकच आहे. काही असले तरी एकजूट ठेवा, कितीही संकटे येऊद्या विजय आपलाच आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे, महाशक्ती आहे, ज्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, त्या पक्षाने आपल्याला सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय देशातील ऐतिहासिक निर्णय आहे.

Advertisement

Advertisement