मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारी गाडी सोडली. आज ते स्वतःच्या गाडीने बाहेर पडले. त्यांनी सरकारी सुरक्षा देखील मागे ठेवली. त्यामुळे लवकरच नवे सरकार स्थापन होऊ शकते, असे संकेत निर्माण झाले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकानंतर निर्माण झालेल्या या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी भाष्य करण्याचे टाळले. संजय राउतांनी महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडण्यास तयार आहे.बंडखोर शिवसैनिकांनी चोवीस तासात परत यावे असे आव्हान केले. त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला. संजय राऊत वक्तव्याला‘एक इशारा काफी है‘असे समजून अजित पवारांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातमी शेअर करा