Advertisement

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झालाय

प्रजापत्र | Wednesday, 22/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यातील राजकारणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मुख्यमंत्री राजीनामा देतील अशा साऱ्या शक्यता बाजूला सारत उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली असून कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झालाय  या शब्दात बंडखोरांचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमधून संवाद साधला असून माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय करायचं ? हे सरळ मलाच का नाही सांगितलं, सुरतला जाऊन सांगायची काय गरज? माझ्यासमोर येऊन आताही सांगा,एकही आमदाराने येऊन सांगावं, तुम्ही मुख्यमंत्री पदाला लायक नाही, मी लगेच खुर्ची सोडतो. पण हे सारं समोर येऊन बोला. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झालाय. माझ्या शिवसैनिकाने येऊन सांगितलं तर मी पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार आहे. मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर जर सेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी केव्हाही पद सोडायला तयार आहे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोणत्याही आमदाराने मला येऊन आम्हाला तुम्ही नको असे सांगावे, मी पद सोडायला तयार आहे. आयुष्यात पद महत्वाचे नसते.पद येत असतात, जात असतात. त्यामुळे मला पदाचा मोह नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यातून त्यांनी ते बंडखोरांसमोर नमणार नसल्याचेच स्पष्ट केले आहे. 

 

Advertisement

Advertisement