Advertisement

कर्जबाजारी शेतकऱ्याने पत्नी आणि मुलीसह गाठले थेट मातोश्री

प्रजापत्र | Monday, 26/10/2020
बातमी शेअर करा

पोलिसांनी अडवताच मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर कटुंबासोबत उपोषण 

मुंबई : बँकेच्या कर्जामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने मुंबई गाठत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्न केला होता. महेंद्र देशमुख असं शेतकऱ्याचं नाव आहे. त्याने जानेवारी महिन्यात हा प्रयत्न केला होता. तुझा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असं आश्वासन या शेतकऱ्याला देण्यात आलं होतं. मात्र त्याच्या कर्जाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही म्हणून हा शेतकरी आज पुन्हा एकदा आपल्या पत्नीसह मातोश्री या ठिकाणी आला. त्याने मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. महेंद्र देशमुख हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आहेत. बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या महेंद्र देशमुख यांनी मातोश्रीबाहेर आज उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

   हे सुद्धा वाचा उपमुख्यमंत्री कोरोना पॉजिटीव्ह 

http://www.prajapatra.com/528

 

 

 

Advertisement

Advertisement