Advertisement

एकनाथ शिंदे थोड्याच वेळात शिवसेनेच्या संपर्कात असतील

प्रजापत्र | Tuesday, 21/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई- शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. शिवसेनेतील नाराज आमदारांसह एकनाथ शिंदे हे थेट गुजरातमध्ये निघून गेले आहेत. गुजरातमधील ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे मुक्कामाला आहेत, तिथे गुजरात भाजपमधील काही नेत्यांशी त्यांची चर्चा झाल्याचीही माहिती आहे. शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार हे मंत्रीही शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना फुटणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून पक्षात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींबाबत शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली असून पक्षाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

     मंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वजणच अनेक वर्षांपासून ओळखतो. शिवसेनेसाठी ते सतत कार्यमग्न असतात, कष्ट घेत असतात. विधानपरिषद निवडणुकीतही शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिळून पाठपुरावा केला होता. त्यामुळे थोड्या वेळातच ते पक्षाच्या संपर्कात असतील,' असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. तसंच छोट्या-छोट्या गोष्टींबाबत गैरसमज पसरवून हवेतील बातम्या दिल्या जाऊ नयेत, असं आवाहनही गोऱ्हे यांनी केलं आहे.

Advertisement

Advertisement