परळी-परळी नगर परिषदेने वेळोवेळी प्रसंगानुरूप विविध वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातीचे देयक अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेळीवेळी पत्रकारांनी मागणी करून ही नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन लवकर देयक अदा केली गेली नाही तर १४ जून पासून नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता परंतु अद्याप नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषण अटळ असल्याचा पञकारानी निश्चय केला आहे.
परळी नगर परिषदेने विविध विकास कामांच्या व स्वच्छता तथा आरोग्य विषयक जाहिराती शहरातील स्थानिक तसेच जिल्हा व विभागीय दैनिक, साप्ताहिक आदी माध्यमांना दिलेल्या आहेत. नगर परिषदेने दिलेल्या ऑर्डरनुसार त्या पत्रकारांनी छापलेल्या आहेत. परंतू सदर बिले अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ती काढावीत अशी अनेक वेळा पत्रकारांनी मागणी करूनही बिले निघालेली नाहीत.या मागणीकरिता परळी शहरातील स्थानिक दैनिकांचे, साप्ताहिकाचे संपादक, जिल्हा, विभागीय दैनिकांचे प्रतिनिधी यांनी बिले लवकरात लवकर न निघाल्यास १४ जूनपासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनद्वारे कळविले आहे.या निवेदनावरया निवेदनावर धनंजय आढाव,राजेश साबणे,संजय खाकरे,श्रीकांत जोशी,बाळासाहेब कडबाने,रामप्रसाद गरड,सतिष बियाणी,धनंजय आरबुने,रानबा गायकवाड,मोहन व्हावळे,धिरज जंगले,प्रकाश चव्हाण,गौतम साळवे,दिलिप बद्दर,रविंद्र जोशी,विकास वाघमारे,भिमा जगतकर,महादेव शिंदे,शेख बाबा,अमोल सुर्यवंशी,अभिमान मस्के,माणिक कोकाटे,बालासाहेब मुजमुले,श्रीराम लांडगे,शिरिष सोलपुरे,भगवान साकसमुद्रे,किरण धोंड,ज्ञानोबा सुरवसे व महादेव गित्ते अदी पञकार,संपादक यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
बातमी शेअर करा