बीड-जिल्ह्यात कोरोनाचा आलेख मागील दहा ते पंधरा दिवसांपासून घसरला होता.यावेळी 'तपासण्या कमी कोरोना कमी' हे सूत्र वापरण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले होते.मात्र मागील दोन दिवसांपासून कोरोनाच्या तपासण्या दिवसाला २ हजारांच्या घरात होत असून पॉझिटिव्ह व्यक्ती शंभराच्या आत येत असल्याने जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरत आहे.शनिवारी (दि.२४) दुपारी आरोग्य विभागाच्या अहवालात २०१७ निगेटिव्ह आले असून ७७ पॉझिटिव्ह सापडले आहेत.
लागण झालेल्या व्यक्तीमध्ये अंबाजोगाई -३, आष्टी -५, बीड -२१, धारूर -३, गेवराई -१९, केज-४, माजलगाव- ६, परळी-७, पाटोदा-२, शिरूर-३ तर वडवणीत चौघे पॉझिटिव्ह आले.
बातमी शेअर करा