मोबाईल गेम खेळू न देणाऱ्या आईची १६ वर्षीय मुलाने हत्या केली आहे. यानंतर मुलाने आपल्या १० वर्षीय बहिणीला खोलीत बंद केलं आणि आईच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. तीन दिवस मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता. लखनऊनच्या पीजीआय परिसरात ही घटना घडली आहे.
आईचा मृतदेह कुजून त्यातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर मुलाने वडिलांनी फोन केला आणि हत्या झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर चौकशी केली असता अडीच तासातच संपूर्ण उलगडा झाला. मुलगा आपली ४० वर्षीय आई साधना आणि १० वर्षीय बहिणीसोबत राहत होता. मुलाचे वडील लष्कर अधिकारी असून कोलकातामध्ये तैनात आहेत.रविवारी जेव्हा महिलेने आपल्या १६ वर्षीय मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं तेव्हा तो रागावला. यानंतर त्याने वडिलांची परवाना असणारी पिस्तूल घेतली आणि आईच्या डोक्यात गोळी झाडली. महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने पिस्तूल तिथेच बेडवर ठेवलं आणि १० वर्षीय बहिणीला दुसऱ्या खोलीत बंद केलं.मुलगा तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत घरातच होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्गंध बाहेर जाऊ नये यासाठी तो वारंवार घरात रुम फ्रेशनर मारत होता.
बातमी शेअर करा