Advertisement

कोरोनाची चिंता...पण शाळांची घंटा वाजणार

प्रजापत्र | Sunday, 05/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई-कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मात्र, काळजी घेऊन शाळा सुरुच राहणार, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 13 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभाग शाळांकरीता नवी कोरोना नियमावली जारी करेल, असेही शिक्षणमंत्री म्हणाल्या. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.
पुढे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय काही दिवसात घेऊ. मध्यंतरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवर्षी शाळा या 13 जूनपासून सुरू होतात. शाळांमध्ये पूर्णपणे काळजी घेण्यात येईल, असे गायकवाड म्हणाल्या.

 

Advertisement

Advertisement