Advertisement

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

प्रजापत्र | Monday, 30/05/2022
बातमी शेअर करा

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने फोन करून चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या फोन कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

रुपाली चाकणकर यांना दिलेल्या धमकीचे कारण अद्याप समजू शकले नाही. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा कारभार स्वीकारल्यानंतर अनेक कामे केली आहेत. राज्यात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडींवर रुपाली चाकणकर यांनी लगेच दखल घेतलेली आहे. अशातच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन कॉल आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधीही रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले आहेत. 

 

 

दरम्यान, रुपाली चाकणकर या महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचे महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.  आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.
 

Advertisement

Advertisement