Advertisement

धर्मवीर चित्रपटाच्या मोफत 'शो' चे आयोजन

प्रजापत्र | Wednesday, 18/05/2022
बातमी शेअर करा

बीड दि.१८ (प्रतिनिधी)-शिवसेनेचे ज्वलंत विचार अंगीकृत करून, धर्मवीर आनंदजी दिघे यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा बहुचर्चीत चित्रपट सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटच्या शो चे तीन दिवस मोफत आयोजन बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी आयोजन केले आहे.
               शुक्रवार, शनिवार व रविवार म्हणजे २० ते २२ मे या सलग तीन दिवसासाठी सायंकाळी ६ वाजताच शो मोफत ठेवण्यात आला आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेना स्थापन केली, त्यांच्या तालमीत तयार केलेले शिवसैनिक, व लाखात एक तयार झालेला धर्मवीर आनंदजी दिघे आजच्या शिवसैनिकांना समजवेत, अनुभवता यावेत म्हणून या मोफत शोचे आयोजन केले असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.धर्मवीर चित्रपटा च्या मोफत तिकीट साठी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप याच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी. शिवसैनिक व शिवसेनेवर प्रेम असणाऱ्या तमाम जनतेने यचा लाभ घ्यावा असे आव्हाहन जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.

 

Advertisement

Advertisement