बीड दि.१४ (प्रतिनिधी): पाटोदा(Patoda) तालुक्यातील काकडहिरा- निरगूडी रोडवर भरधाव पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची (Accident)धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याची घटना आज सोमवार (दि.१४) रोजी सकाळी ०८:०० च्या सुमारास घडली.
काकडहिरा येथील वामन महादेव तावरे (वय ५४) आणि सुभाष आप्पाराव जायभाये हे आज सकाळी दुचाकी क्रमांक एम.एच.२३. के.७०१५ वरून काकडहिरा येथून निरगुडीला जात असतांना काकडहिरा शिवारात समोरून(Accident) येणारा पिकअप क्रमांक एम.एच.१६.ए.वाय. ९३८२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील पिकअप भरधाव चालवून जायभाय, तावरे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी (Beed)बीडच्या एका खाजगी रूग्णालयात आणले. तेथून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या अपघाताची नोंद जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा