मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात १६,१७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १४ लाख ३१,८५६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही ८८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे.दरम्यान, गुरुवारी ७,५३९ नव्या रुग्णांचे निदान तर १९८ मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १६ लाख २५,१९७ तर बळींचा आकडा ४२,८३१ वर गेला आहे. राज्यात सध्या १ लाख ५०,०११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्युदर २.६४ टक्क्यांवर गेला आहे.
बातमी शेअर करा