Advertisement

कारभारी ढाकणे यांच्या वर्षश्रद्धानिमित्त सुधाकर शास्त्रीचें प्रवचन

प्रजापत्र | Tuesday, 17/05/2022
बातमी शेअर करा

हातगांव-माजी प्राचार्य दिवंगत कारभारी ढाकणे यांच्या व्दितीय वर्षश्रद्धानिमित्त रविवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता सुधाकर महाराज शास्त्री (भगवान गड संस्थान,श्रीक्षेत्र पैठण) यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांचे पुतणे दादासाहेब ढाकणे ( राष्ट्रीय संपर्कप्रमुख वंजारी ओबीसी विकास महासंघ भारत) यांनी दिली आहे.
           माजी प्राचार्य दिवंगत कारभारी ढाकणे यांनी आपल्या हयातीत हजारो विद्यार्थ्यांना घडविले.ते आदर्श शिक्षण म्हणून परिचित होते.दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या वर्षश्रद्धानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी (दि.२२) ढाकणे वस्ती,पैठण-पंढरपूर पालखी मार्गा,हातगांव (ता.शेवगाव) येथे सुधाकर महाराज शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रकला ढाकणे,विश्वनाथ ढाकणे,गहिनीनाथ ढाकणे,डॉ.प्रवीण ढाकणे,प्रशांत कारभारी ढाकणे,प्रतिमा राजू पालवे,शैला अशोक गोल्हार यांच्यावतीने करण्यात आले.  

Advertisement

Advertisement