Advertisement

राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टचा समाचार

प्रजापत्र | Saturday, 14/05/2022
बातमी शेअर करा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेच्या पोस्टचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समाचार घेतला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, अशा शब्दांत राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

  कोणी तरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत काहीतरी श्लोकांसारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे अस नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,' असं राज यांनी पत्रकात म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement