अहमदपूर प्रतिनिधी दि....
ऊस तोडणीसाठी आलेल्या पाच महिलांचा तुळशीराम तांडा येथील तलावात बुडून मृत्यू झालेली दुर्दैवी घटना घडली आहे तलावा मध्ये धुन धुण्यास गेलेल्या महिला धुन धुता धुता एक जनींचा पाय घसरून पाण्यात पडली असताना राहिलेल्या चौघीनी एकमेकींना वाचविण्याच्या नादात रामपूर तांडा ता.पालम जि परभणी येथील रहिवासी असलेल्या महिला तुळशीराम तांडा येथे ऊस तोड करत होत्या
मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे नाव.1) राधाबाई धोंडीबा आडे वय. 45, दिशा धोंडीबा आडे वय 22,काजल धोंडीबा आडे वय 19,सुषमा संजय राठोड वय 22,अरूणा गंगाधर वय 26. या पाच महिलांची दुर्दैवी घटना घडली आहे तसेच लहान मुलांचा आरडा...ओरडा व रडण्याचा आवाज आल्याने मोटरसायकल वरून जात असताना एका युवकांचे लक्ष वेधले व त्यांनी तुळशीराम तांड्यात जाऊन लोकांना सांगितली व गावातील लोक तलावाकडे धावत सुटली
व गावातील काही नागरिकांनी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलांना बाहेर काढले या घटनेची माहिती किंनगाव पोलिसांनी मिळताच त्यांनी तातडीने घटना स्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा करून तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींचा गुंणा किनगाव पोलीस स्टेशन मध्ये केला आहे तरी पुढील तपास जमादार रामचंद्र गोकरे करत आहेत