मुंबई : आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात (gold prices) घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत होती. मात्र आज सोन्याचे दर घसरले आहेत. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचा (gold) दर प्रति तोळा 46,450 इतका आहे. तर 24 कॅरट (24carats) सोन्याचा दर प्रति तोळा 50,670 इतका आहे. गुरुवारी 22 कॅरट सोन्याचा दर 47,200 रुपये इतका होता. म्हणजेच आज 22 कॅरट सोन्याचा दरात प्रति तोळा 750 रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 820 रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,490 रुपये इतके होते. आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,450 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर 50,670 इतका आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,450 असून 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50,670 रुपये इतका आहे. सोन्याचे दर दिवसांतून दोनदा बदलतात. त्यामुळे अनेकदा सोन्याच्या दरात तफावत आढळून येते. आज चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 58,700 रुपयांवर पोहोचले आहेत.
बातमी शेअर करा