Advertisement

आता हॉटेलमधील जेवणही महागणार

प्रजापत्र | Saturday, 07/05/2022
बातमी शेअर करा

देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. 

 

 

मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला इंधन कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०४ रुपयांची वाढ केली होती. परंतू घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीला हातही लावला नव्हता. परंतू सातव्या दिवशीच कंपन्यांनी सामान्यांना जोराचा धक्का दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. 

 

 

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता हॉटेलमधील जेवणही महागणार असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादमधीलहॉटेल्स असोसिएशनने २० टक्के दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढत्या महागाईत काळात सध्याच्या रेटमध्ये जेवण पुरवणे शक्य होणार नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले आहे.

 

 

दिल्लीत १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढून २३५५ रुपये प्रति सिलिंडर झाले. यापूर्वी १ एप्रिल रोजी कमर्शिअल सिलिंडरचे दर २६८.५० रुपयांनी वाढले होते. आरबीआयने महागाई वाढल्यामुळे काही दिवसांपूर्वीच अचानक मिटिंग घेत रेपो रेट वाढविले होते. यामुळे लोकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजदर वाढणार आहेत. त्यातच आता गॅसच्या दरात वाढ झाल्याने महागाई आणखी वाढणार आहे. 

 

 

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. याआधी २२ मार्च रोजी घरगुती घरगुती सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ९४९.५० रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे

Advertisement

Advertisement