Advertisement

हाणामारीत युवकाचा खून

प्रजापत्र | Saturday, 30/04/2022
बातमी शेअर करा

परळी दि.30 (वार्ताहर) : परळी शहरात तलवारी बनविण्याचा कारखाना पोलीसांनी उध्वस्त केल्याच्या काही तासानंतर शहराच्या गणेशपार भागात एका तरुणावर सायंकाळीच हल्ला करण्यात आला. यात या तरुणाचा मृत्यु झाला आहे. गणेशपार या गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

 

शनिवार दि 30 रोजी सायंकाळी  7:30 च्या सुमारास शैलेश राजनाळे हा युवक सायंकाळी घरातून बाहेर येत असताना अंधाराचा फायदा घेत 2 ते 3 जणांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यात शैलेश गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने परळीच्या उपजिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला.

 

 

गणेशपार हा परळी शहरातील महत्वाचा भाग मानला जातो. या परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या खुनाच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement