Advertisement

बीडच्या चौघांना महासंचालकांचे पोलीस पदक

प्रजापत्र | Saturday, 30/04/2022
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालकांच्या पोलीस पदकांची घोषणा झाली आहे. यात बीड मधील चौघांचा समावेश आहे. उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांना हे पोलीस पदक दिले जाते.
पोलीस महासंचालकांच्या पोलीस पदकांच्या यादीत या वर्षी बीड जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल हनीफ अब्दुल रहिम, नारायण साबळे यांच्यासह पोलसी कर्मचारी देविदास जमदाडे आणि भारत बंड यांना हे पोलीस पदक जाहीर झाले आहे. या बद्दल सर्वांचेच पोलीस दलातून अभिनंदन होत आहे.

 

 

मिश्रा, पोद्दार यांनाही पदक
यापूर्वी बीड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून काम केलेल्या विरेंद्र मिश्रा आणि हर्ष पोद्दार या दोघांचाही पोलीस पदकाने सन्मान होत आहे.
 

Advertisement

Advertisement