मुंबई : राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे शरीराची लाहीलाही झालीय. उष्माघातामुळे आतापर्यंत काहींचा मृत्यूही झाला आहे. राज्यात एका बाजूला कडकडीत उन आहे. राज्यात उष्णतेची लाट असताना हवामान विभागाकडून (India Meteorological Department) अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. (chance of showers with strong winds in vidarbha marathwada south central maharashtra and south konkan on 21st and 22nd april imd alets)
पाऊस कुठे आणि कधी?
येत्या 21 आणि 22 एप्रिलला विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचं अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.