Advertisement

तलवाडामध्ये गांज्याची शेती

प्रजापत्र | Monday, 18/04/2022
बातमी शेअर करा

गेवराई-तालुक्यातील तलवाडा येथे ऊसाच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर व तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी पथकासह धाड टाकली. यामध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. 
      गेवराई तालुक्यातील तलवाडा शिवारात बाळू अंकुश खवाटे यांची शेती असून त्यांनी ऊसात गांजाची झाडे लावली आहेत. ती सध्या डोक्याऐवढी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळताच त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांना सोबत घेऊन पथकासह खवाटे यांच्या शेतात धाड टाकली. यावेळी ऊसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास वीस ते पंचवीस गांजाची झाडे जवळपास पाच ते सहा फुट वाढलेली आढळून आली. ही सर्व झाडे पोलिसांनी जप्त करत आरोपी बाळू खवाटे यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Advertisement

Advertisement