मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज (दि.१८) दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, राज्याचे पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी अनिवार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून महत्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.
नाशिक पोलिसांनी घेतला हा निर्णय
सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. 3 मे पर्यंत ही परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेतल्या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार आहे. मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई करण्यात आली आहेत. हे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.