Advertisement

राज ठाकरे अल्टिमेटमवर ठाम

प्रजापत्र | Sunday, 17/04/2022
बातमी शेअर करा

पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत मशिदींवरील भोंग्यांबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. भोंग्याचा मुद्दा हा धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. रमजाननंतर राज्यासह देशभरातील मशिदींनी भोंगे बंद करावेत, या आपल्या अल्टिमेटमवर आपण ठाम असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, यानंतरही मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर त्या मशिदींसमोर आम्ही भोंग्यावरून हनुमान चालिसा लावणारच, असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी आपल्याला दंगल पेटवायची नाही असेही वक्तव्य केले आहे. 

 

५ जूनला अयोद्धेचा दौरा
आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांसह 5 जून रोजी अयोद्धेला जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेणार आहोत. तसेच, महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादेतील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानामध्ये जाहीर सभा घेणार आहोत, अशी माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली. मात्र, अयोद्धेचा दौरा तसेच सभा नेमक्या कोणत्या विषयावर घेणार, याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

 

महाराष्ट्रात आम्हाला दंगल घडवायची नाही!
भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंवर केला आहे. त्यावर राज्यात आम्हाला दंगल घडवायची नाही. मात्र, रमजाननंतरही भोंगे उतरले नाहीत, तर मनसेकडून सर्व बाजून तयारी करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, मुस्लिम समाजालाही या गोष्टी समाजायला हव्या. लोकांना त्रास होतो. याची कल्पना त्यांना असायला हवी. आमच्यावर दगडफेक झाल्यावर आमचे हात काही बांधलेले नाही, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement