महाराष्ट्रासह 4 राज्यांतील लोकसभेच्या 1 व विधानसभेच्या 4 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा व बीलागंज विधानसभा मतदार संघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा मोठा विजय झाला. याठिकाणी तृणमूलचे शत्रुघ्न सिन्हा व बाबुल सुप्रियो विजयी झालेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांचा जवळपास 19 हजार मतांनी दारुण पराभव केला आहे. दुसरीकडे, बिहारच्या बोचहा मतदार संघात राजदच्या अमर पासवान यांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे. तर छत्तीसगडच्या खैरागढ विधानसभा मतदार संघातही काँग्रेसच्या यशोदा वर्मा यांचा तब्बल 20 हजार मतांनी विजय झाला आहे.
बातमी शेअर करा