Advertisement

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले ?

प्रजापत्र | Saturday, 16/04/2022
बातमी शेअर करा

या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सलग सहावेळा पराभव पत्करावा लागला आहे. आतापर्यंतच्या एकाही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सलग सहा पराभव एकदाही पत्करावे लागलेले नाहीत. यापूर्वी मुंबईने सलग पाच पराभव पाहिले होते आणि त्यानंतर त्यांनी आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये धडक मारली होती. पण यावेळी मात्र त्यांना सलग सहा वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे आणि त्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. पण तरीही मुंबईचा संघ अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतो. कारण या हंगामात प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. मुंबईचे आतापर्यंत सहा सामने झाले आहेत आणि त्यांना अजूनही आठ सामने खेळायचे आहेत. जर मुंबईला थेट प्ले-ऑफ गाठायचे असेल तर त्यांना सलग आठ सामने जिंकण्यावाचून पर्याय नसेल. कारण आठ सामने जिंकून मुंबईच्या संघाचे १६ गुण होऊ शकतात. पण त्यामुळे मुंबईच्या संघाचे आव्हान अजूनही संपलेले नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये १४ गुण पटावूनही बरेच संघ प्ले - ऑफमध्ये दाखल झालेले सर्वांनीच पाहिले आहे. पण त्यासाठी त्या संघांना आपला रनरेट हा उत्तम ठेवावा लागतो. त्यामुळे मुंबईच्या संघाने सात सामने मोठ्या फरकाने जिंकले तरी देखील त्यांना प्ले - ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे मुंबईचे सलग सहा पराभव झाले असले तरी त्यांचे आव्हान अजूनही संपुष्टात आलेले नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबईची सुरुवात चांगली होत नाही, पण तरीही ते बाद फेरीत पोहोचतात, असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मुंबईला अजूनही बाद फेरीत जाण्याची संधी असेल. पण त्यासाठी आता पराभवाची डबल हॅट्रिक झटकून त्यांना नव्या जोशाने मैदानात उतरावे लागणार आहे. अजून दोन सामने तरी त्यांच्या हातामध्ये नक्कीच आहेत. त्यामुळे आता मुंबईचा संघ पुढच्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Advertisement

Advertisement