नवी दिल्ली-आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत (शुक्रवारी) भारतात ९४९ नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. यामुळे आता, भारतातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ११,१९१ वर पोहोचली असून दोन दिवसांपासून भारतात कोरोनाचे नवे रुग्ण काहीसे वाढले असल्याचे केंड्रिय आरोग्य मंत्र्यालयाने म्हटले आहे.कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात आयआयटी कानपूरने ही अंदाज वर्तविला असून यात चौथी लाट जूनमध्ये येईल असे सांगितले आहे.
गेल्या जवळपास 2 वर्षांपासून, कोरोनाचे नव-नवे व्हेरिअंट सातत्याने समोर येत आहेत. यातच आता, कोरोनाचा नवा व्हेरिअंट XE नेही भारताच्या गुजरात आणि महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.चौथी लाट केव्हापर्यंत येऊ शकते, यासंदर्भात आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांनी एक संशोधन केले असून २२ जून २०२२ च्या जवळपास देशात कोरोनाची संभाव्य चौथी लाट सुरू होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.