Advertisement

शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला ?

प्रजापत्र | Friday, 08/04/2022
बातमी शेअर करा

मुंबई दि.8 एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी (ST employees) अचानकपणे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी थेट पवारांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर चप्पल फेकून हल्ला केला.

 

काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) सुणावनीनंतर आनंदोत्सव साजरा करणारे एसटी कर्मचारी आज अचानकपणे पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी धडकले. एसटी महामंडळाच्या (ST corporation) विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. काल कोर्टाच्या निर्णयानंतर ही आज कर्मचारी अचानक आक्रमक झाले.

 

यावेळी काही आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी घुसून चप्पल फेक केली. यावेळी महिला आंदोलक ही आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आंदोलनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) वाय बी चव्हाण सेंटर येथून त्या सिल्वर ओक (Silver Oak) या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. त्यांनी यावेळी आंदोलकांना हात जोडून शांततेचं आवाहन केलं आहे. चर्चेसाठी तयार आहोत पण शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी आंदोलकांना केली आहे.

 

‘चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाही. माझे कुटुंब घरात आहे. त्यांची सुरक्षा मला पाहू द्या. त्यानंतर मी त्यांच्यासोबत बसून चर्चेला तयार आहे.’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मात्र आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मध्यस्थी करत सुप्रिया सुळे यांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी सुळे यांनी पोलिसांचे आभार मानले.

 

घटनेचा निषेध.

सदर घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री तथा भाजपाच्या केंद्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सदर प्रकार धक्कादायक व निषेधार्य असल्याची प्रतिक्रिया दिली. घटनेची गांभिर्याने दखल घेण्यात येणार असुन चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलिप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले. सदर हल्ल्यात कर्मचाऱ्यांचा वापर करुन कट रचल्याची शक्यता व्यक्त करत दोषीवर कारवाई करण्याचा इशारा पाटील यांनी दिला.

 

( Shocking … Attack of ST employees at Sharad Pawar’s residence? )

Advertisement

Advertisement