Advertisement

'या' शिवसेना नेत्याच्या तब्ब्ल ४१ मालमत्ता जप्त

प्रजापत्र | Friday, 08/04/2022
बातमी शेअर करा

मुंबई-महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. गुरुवारी रात्री उशिरा आयकर विभागाने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता जप्त केल्या. गेल्या महिन्यात जाधव यांच्या दोन घरांवर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते.
आयकर विभागाने आज जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये वांद्रे येथील ५ कोटी रुपयांच्या भूखंडाचा समावेश आहे. याशिवाय भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेमधील ५  कोटींचे दोन फ्लॅट्सही आयकर विभागाने जप्त केले आहेत. गेल्या वर्षभरात आयकर विभागाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 

किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर कारवाई
मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेले यशवंत जाधव आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. जाधव यांनी कोविड काळात त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात 15 कोटी रुपये वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच, महापौरांच्या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचा आरोपही सोमय्या यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केला. याप्रकरणी त्यांनी आयकर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे.
 

Advertisement

Advertisement