Advertisement

राज ठाकरेंच्या दणक्यानंतरही वसंत मोरे म्हणाले...

प्रजापत्र | Thursday, 07/04/2022
बातमी शेअर करा

पुणे-पुणे शहर मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतरही वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. "मी माझी भूमिका बदलणार नाही. भोंग्यांसंदर्भात आधी जी भूमिका मी घेतली होती, तीच माझी आताही भूमिका आहे. मी झुकणार नाही, माझी भूमिका बदलणार नाही. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला लोकांना तोंड द्यावं लागतं", अशा स्पष्ट शब्दात वसंत मोरे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली.
मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात ठामपणे विरोधाची भूमिका घेतलेल्या पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेंना राज ठाकरेंनी दणका दिलाय. त्यांची शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांच्याकडे राज ठाकरे यांनी पुणे शहराचं नेतृत्व दिलंय. वसंत मोरेंनीही पक्षाचा आदेश मान्य करत साईनाथ बाबर यांचं मोठ्या मनाने अभिनंदन केलंय. पण पक्षाचा आदेश मान्य करताना आपल्या भूमिकेवरुन आपण तसूभरही मागे हटलो नाही, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

Advertisement

Advertisement