Advertisement

नाशिकजवळ जयनगर एक्स्प्रेसला मोठा अपघात

प्रजापत्र | Sunday, 03/04/2022
बातमी शेअर करा

नाशिकहून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या लहवीत व देवळाली दरम्यान पवन एक्सप्रेसचे काही डब्बे रुळावरुन घसरलेत. दुपारी 3.0 च्या सुमारास डाउन लाइनवर झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा बळी गेल्याची माहिती आहे. या घटनेत अन्यही काहीजण जखमी झालेत. ही रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनसहून जयनगर (दरभंगा)कडे जात होती.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.30 वाजता 11061 LTT-पवन एक्सप्रेस सुटली. दुपारी तीनच्या दरम्यान ही एक्सप्रेस नाशिकजवळील देवलाली येथे आली असता Dn मार्गावर अचानक रुळावरून दहा डब्बे घसरले.

 

 

एक्सप्रेस गाडीला झालेल्या या अपघाताचे वृत्त कळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहुन सकाळी 11.30 वाजता नाशिककडे निघालेल्या पवन एक्सप्रेसला नाशिकजवळच्या देवळाली येथे अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Advertisement

Advertisement