माजलगाव - तालुक्यातील पात्रुड येथे पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 32 लाख 48 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे.
पात्रुड येथील मोमीन बाबु अब्दुल मजिद याच्या घरी व शेतातील गोडाउन मध्ये गुठखा असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त माहिती मिळाली त्यावरुन त्यांच्या पथकाने धाड टाकली असता तेथे गोवा राजनिवास हिरा एकूण 32 लाख 48 हजार रुपयाचा गुठखा मिळून आला. तो जप्त करून पोलीस ठाणे माजलगाव येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या गुप्त बातमी वरून बालाजी दराडे बाबासाहेब बांगर राजू वंजारे संजय घुले यांनी केली आहे.
बातमी शेअर करा