Advertisement

मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

प्रजापत्र | Wednesday, 30/03/2022
बातमी शेअर करा

आष्टी(प्रतिनिधी)-मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून चोरीची एक जेसीबी आणि ट्रॅक्टर,असा तेवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला.आष्टी पोलिसांनी ही कारवाई केली.

 

 

           योगेश सुरवसे,योगेश रेडेकर,अजय पारेकर,रघुनाथ वैष्णव (रा.सर्व आष्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आष्टी पोलासांना गुप्त खब-या मार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीस कर्मचारी प्रविण शिरसागर,शिवप्रसाद तवले प्रदिप पिंपळे यांनी वरील चौघांची केली असता त्यांच्याकडे चोरीचा जेसीबी आणि टॅक्टर चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.पोलिसांनी आरोपींकडून एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर असा एकूण तेवीस लाखाचा ऐवज जप्त केला.वरिल आरोपी हे आष्टी व परिसरातून वाहनांची चोरी करून ते अहमद नगर येथे विक्रीला नेत असत आणि आलेल्या पैशातून मौजमजा करायचे असे तपास निष्पन्न झाले असून,आरोपींना आष्टी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची म्हणजे दि.1 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी आष्टी न्यायालयाने सुनावली आहे.आष्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीलिम चाऊस,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास प्रविण शिरसागर,शिवप्रसाद तवले,प्रदिप पिंपळे,हंगरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
 

Advertisement

Advertisement