माजलगाव – मित्राच्या लग्नात डीजे च्या तालावर बेधुंद होऊन नाचल्यानंतर पाणी पिणे एकाच्या जीवावर बेतलं आहे.वैभव रामभाऊ राऊत या पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उन्हाचा फटका बसल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने हा मृत्यू झाला असावा अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे माने कोळसे शुभविवाहाचे आयोजन केले होते.या लग्नात नवरदेव अक्षय माने याचे माजलगाव येथील काही मित्र आले होते.नवरदेवाची वाजत गाजत वरात निघाल्यानंतर वैभव हा आपल्या मित्रांसह बेधुंद होऊन नाचला.
तास दोन तास वरातीत नाचल्यानंतर हे सगळे मित्र लग्न मंडपात आले,त्याठिकाणी वैभव याने पाणी पिले अन तो जागेवरच कोसळला.त्याला माजलगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
या घटनेने शिंदेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.अगोदरच वाढत असलेले ऊन अन त्यात दीड दोन तास नाचल्याने हृदयविकार चा त्रास झाल्याने हा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.