मुंबई: प्रथम ईशान किशनची स्फोटक फलंदाजी आणि त्यानंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. पण दिल्लीच्या ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी मुंबई इंडियन्सच्या स्वप्नावर पाणी फेरले. दिल्लीने आयपीएल २०२१च्या पहिल्या लढतीत मुंबईवर ४ विकेटनी विजय मिळवला.
विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात फार खराब झाली. मुरुगन अश्विनने चौथ्या षटकात टिम सेफर्टला माघारी पाठवले. त्याने १४ चेंडूत २१ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या मनदीप सिंगला अश्विनने शून्यावर बाद करून दिल्लीला दुसरा धक्का दिला. दिल्लीची अवस्था २ बाद ३० अशी असताना कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीला आला. पंत चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने मुंबईला धोका होता. पण टायमल मिल्सने त्याला एक धावसंख्येवर बाद केले. पंत बाद झाल्याने मुंबईने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पंतच्या जागी आलेल्या ललित यादवने पृथ्वीला साध दिली. पृथ्वी आणि यादवची जोडी जम बसवेल असे वाटत होते तेव्हा बेसिल थंपीने पृथ्वीला ३८ धावांवर बाद केले आणि दिल्लीला चौथा धक्का दिला. त्याच्या जागी आलेल्या पॉवेलला थंपीने शून्यावर माघारी पाठवले. दिल्लीचा निम्मा संघ ७२ धावांत पॅव्हेलियमध्ये परतला.
त्याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा आणि ईशान यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. रोहित ३२ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला अनमोलप्रीत सिंह ८ धावांवर माघारी परतला. तर तिलक वर्माने १५ चेंडूत २२ धावांचे योगदान दिले. वर्माच्या जागी आलेला कायरन पोलार्ड पुन्हा एकदा अपयशी ठरला, तो फक्त ३ धावांवर बाद झाला. मुंबईने या वर्षी पोलार्डला रिटने गेले होते. एका बाजूला मुंबईच्या विकेट पडत होत्या तर दुसऱ्या बाजूला ईशान किशन धावांचा वेग वाढवत होता. अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिडने त्याला चांगली साथ दिली. डेव्हिडने ८ चेंडूत १२ धावा केल्या. तर डॅनियल सॅम्सने २ चेंडूत ७ धावा केल्या. ईशान किशन ८१ धावांवर नाबाद राहिला. त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर खलील अहमदने २ विकेट घेतल्या.