Advertisement

तरुणास बेदम मारहाण

प्रजापत्र | Saturday, 26/03/2022
बातमी शेअर करा

केज दि.२६ – जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास फोनवरून शिवीगाळ करीत अचानक येऊन काठीने बेदम मारहाण केल्याची घटना चिंचपूर ( ता. धारूर ) येथे शनिवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

       चिंचपूर ( ता. धारूर ) येथील ज्ञानेश्वर उत्तम साखरे ( वय २२ ) हा शुक्रवारी रात्री त्याच्या शिवारातील शेतातील बोअरजवळ झोपला होता. शनिवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास गावातील छत्रभुज साहेबराव थोरात याने फोनकरून जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. तर अचानक येऊन छत्रभुज थोरात याने काठीने ज्ञानेश्वर साखरे याच्या पाठीवर व गुडघ्यावर मारून दुखापत करीत बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वर साखरे यांच्या फिर्यादीवरून छत्रभुज थोरात याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संपत शेंडगे हे करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement