दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ अंतिम निकाल जाहीर केला आहे. याची लेखी परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती, तर मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडल्या होत्या. या दोन्ही टप्प्यांच्या आधारे आयोगाने एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) तसेच केंद्र सरकारच्या गट ‘अ’ आणि ‘ब’ सेवांमध्ये केली जाणार आहे. या वर्षीच्या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राजेश्वरी सुवे एम, तिसऱ्या क्रमांकावर आकांश धुल्ल, चौथ्या क्रमांकावर राघव झुनझुनवाला आणि पाचव्या क्रमांकावर ईशान भटनागर यांनी स्थान मिळवले आहे.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ३१७ सामान्य प्रवर्गातील, १०४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), ३०६ इतर मागासवर्गीय (OBC), १५८ अनुसूचित जाती (SC) आणि ७३ अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.

