मुंबई : पेट्रोल, डिझेलसोबतच आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची भाववाढ (Inflation) झाली आहे. सर्वसामान्यांसाठी हक्काचं आणि स्वस्त असं औषध समजल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह तब्बल 800 औषधांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीनं (National Pharmaceutical Pricing Authority of India) ही दरवाढ केली आहे. 10.7 टक्क्यांची वाढ यावेळी करण्यात आलेल्या घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेतील होलसेल प्राईज इंडेक्स आणि 2020 च्या तुलनेत ही 10.7 टक्क्यांची वाढ सर्वसामान्यांच्या खिशावर ताण टाकेल, असं जाणकार सांगतात. सर्वसामान्यांच्या वापरातील दैनंदिन औषधांच्या किंमती यामुळे वाढणार आहेत. या किंमतीमध्ये 10.7 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली जाऊ शकते. 1 एप्रिलपासून नवे दर (New rates from 1st April) लागू केले जाणार आहेत. होलसेल प्राईज इंडेक्स म्हणजे WPIनं दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास आणि विचार करुनही ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. एनजीजीए म्हणजेच नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीनं याबाबतची माहिती दिली आहे.
कुणाला सर्वाधिक फटका?
नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटीनं शुक्रवारी एक पत्रक जारी करत याबाबतचा आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार आता तापावरील औषधांच्या किंमती महागण्याची दाट शक्यता आहे. फक्त तापच नव्हे, तर तापासारख्या इतरही अनेक छोट्या मोठ्या आजारांवरील औषधं महागणार आहेत.
खालील आजारांवरील औषध महागणार
ताप
संसर्गजन्य आजार
इनफेक्शन किंवा एलर्जी
हृदयरोग
उच्च रक्तदाब
त्वचेचे विकार
अशक्तपणा
कोणत्या औषधांच्या किंमती थेट वाढणार?
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार खालील औषधांच्या किंमतींच दरवाढ होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण वरील नमूद केलेल्या आजारांवर दिली जाणारी औषधं महागणार आहेत. ही काही औषधं खालीलप्रमाणे आहेत :
पॅरासिटेमॉल
हिनोबारबिटोन
फेनिटॉईन सोडियम
अझिथ्रोमेसिन
सिप्रोफ्लोक्सेसीन हायड्रोक्लोराईड
मेट्रोनीडाझोल, इत्यादी