Advertisement

शेकडो कार्यकर्त्यांसह हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना

प्रजापत्र | Saturday, 26/03/2022
बातमी शेअर करा

मुंबई-भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) अधिकच आक्रमक झाले आहेत. आज सकाळीच सोमय्या परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab Resort) यांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्यासाठी दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी एक प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे. (kirit somaiya on dapoli tour)

     राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरुडमध्ये रिसॉर्टबाबत सोमय्यांनी आरोप केले होते. तसंच, आज आपण अनिल परबांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज सोमय्या सात वाजेच्या सुमारास मुंबईतील आपल्या घरापासून दापोलीला निघाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. किरीट सोमय्या तब्बल १५० गाड्यांचा ताफा घेऊन दापोलीमध्ये जाणार आहेत.

 

मीडियाला चित्रीकरणास बंदी

 

सोमय्या आज संध्याकाळी साई रिसॉर्टवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक त्यांना दापोलीतच अडवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाद वाढू नये म्हणून दापोली पोलिसांनी खबरदारी म्हणून बंदोबस्त लावला आहे. दरम्यान या वेळेत साई रिसॉर्ट परिसरात मीडियाला चित्रीकरण करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement