Advertisement

अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या

प्रजापत्र | Friday, 25/03/2022
बातमी शेअर करा

पुणे : एका 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण (Sexually Abusing) करुन त्याची निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादाक घटना पुण्यातील कोथरुडमध्ये गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. या अत्याचार आणि हत्येप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपी हा तरुण आणि पीडित मुलगा हे दोघेही शेजारी आहेत. हत्येनंतर तरुणाने मुलाचा मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (21-year-old arrested in Kothrud for sexually abusing a minor in Pune)

 

 

पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. आरोपीविरोधात आयपीसी 302, 201, 364 आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement