Advertisement

साळेगाव शिवारातील चाळीस एकर जमिनीवरील चारा जळून खाक

प्रजापत्र | Wednesday, 23/03/2022
बातमी शेअर करा

 केज दि.२३ - तालुक्यातील साळेगाव येथे दुपारी वाळलेल्या गवताला अचानक आग लागून सुमारे ४० एकर जमिनीवरील चारा जळून खाक झाला.
                   दि २३ मार्च बुधवार रोजी सकाळी ११ च्या दरम्यान साळेगाव येथे केज-कळंब रोड नजीक नजीरोद्दीन काझी यांच्या शेतातील वाळलेला चारा आणि उभ्या गवताने अचानक पेट घेतला आणि बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. सदरील माहिती लाला अंधारे यांनी पत्रकार गौतम बचुटे यांना दिल्यानंतर बचुटे यांनी तहसीलदार दुलाजी मेंडके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे याना माहिती देताच त्यांनी प्रशासकीय पातळी वरून केज नगर पंचायत आणि कळंब नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देऊन आग विझविण्यासाठी तातडीने बंब पाठविले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तास मेहनत करून आग आटोक्यात आणली. अन्यथा त्या आगीच्या शेजारी असलेल्या उभ्या ज्वारी आणि उसाचे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते व नुकसान झाले असते. मात्र ४० एकर क्षेत्रावरील वाळलेला चार जळून खाक झाला आहे. मात्र सदरील आगीचे कारण समजू शकले नाही.

 

Advertisement

Advertisement