ठाणे दि.२२ – आज सकाळपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात मोठ्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालही तेच आहे. कारण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे तथा रश्मी ठाकरे यांचे बंधू यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. महाराष्ट्रात सध्या ईडी ऍक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे.
दरम्यान, ईडीने आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत.
बातमी शेअर करा