Advertisement

कोरोनाचा आलेख घसरू लागला,जिल्हावासियांना दिलासा

प्रजापत्र | Friday, 16/10/2020
बातमी शेअर करा

बीड : वाढती कोरोनाची रुग्ण संख्या बीड जिल्हावासियांसाठी चिंतेची बाब ठरू लागली असताना आज मिळालेला अहवाल पाहता कोरोनाचा आलेख घसरू लागल्याचे चित्र आहे दुपारी १ वाजता आलेल्या अहवालामध्ये १२१जण पॉझिटिव्ह आले असून तब्ब्ल ५२६ जण निगेटिव्ह आले आहेत. 
              जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र जरी असले तरी आज  कोरोनाचा आलेख मोठ्या प्रमाणावर घसरला असल्याचे समोर आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई-१०, आष्टी-१४, बीड-४० धारूर-१२ गेवराई-८ केज-४, माजलगाव-१० परळी-२, पाटोदा-८, शिरूरकासार -१०आणि वडवणीत ३जणांना कोरोनाची लागण झाली.

Advertisement

Advertisement