मुंबई-मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मालाड भागात एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटला. आज रसायनशास्त्राचा पेपर होता आणि काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. तपासणी केली असता या मुलांच्या फोनमध्ये आज होणाऱ्या रसायनशात्राचा पेपर आढळला. या पेपरफुटीच्या प्रकरणात एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेच्या आधी या शिक्षकाने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर पाठवली होती.
बातमी शेअर करा