Advertisement

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू

प्रजापत्र | Sunday, 13/03/2022
बातमी शेअर करा

गेली काही वर्ष काँग्रेस पूर्णवेळ अध्‍यक्षांशिवाय आपली वाटचाल करत आहे. मात्र पाच राज्‍यांच्‍या निवडणुकांच्‍या निकालानंतर पुन्‍हा एकदा अध्‍यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाला पराभवाचा मोठा फटका बसला आहे. सध्‍या सोनिया गांधी या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्‍हणून काम करत आहेत. मात्र सर्व निर्णय राहुल गांधीच घेत असल्याचा दावा नाराज गटातील नेत्यांकडून केला जात आहे. यात जी 23 या नाराज गटाने अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव सुचवले आहे. अशी माहिती समोर येत आहे.

पाच राज्‍यातील निकालानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जी 23 या नाराज गटाने गांधी कुटुंबाच्‍या बाहेरील व्‍यक्‍तीला अध्‍यक्षपद द्यावे अशी जुणीच मागणी लावून धरली आहे. यसाठी त्‍यांनी मुकुल वासनिक यांचे नाव पुढे केले आहे. पण हे नाव स्वीकारण्यात आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Advertisement

Advertisement