खासदार इम्तियाझ जलील यांच्या मातोश्री जकिया जलील यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून जकिया जलील यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान आज संध्याकाळी सात वाजेदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
खासदार इम्तियाझ जलील यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.त्यांच्या दफनविधी हुजूर शहा मियॉ दर्गा कब्रस्तान, महानगर पालिका समोर येथे रात्री अकरा वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात जफर जलील, खासदार इम्तियाझ जलील आणि जेट एअरवेजचे माजी व्यवस्थापक अहेमद जलील ही तीन मुले आहेत. जकिया जलील यांच्या जाण्याने कुंटुबियांवर दुखा:चा मोठा डोंगर कोसळला आहे.
बातमी शेअर करा