Advertisement

पाच हजाराची लाच घेताना पुरवठा निरीक्षण अधिकारी अटकेत;विनात्रुटी अहवाल पाठवला म्हणून मागितली लाच

प्रजापत्र | Monday, 07/03/2022
बातमी शेअर करा

भूम  :  येथील तहसील कार्यलयात कार्यरत असणारे पुरवठा निरीक्षण अधिकारी याने तालुक्यातील  तक्रारदाराच्या दोन रेशन दुकानाचा विना त्रुटी अहवाल वरिष्ठांना दिला म्हणून पाच हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ 7 मार्च रोजी पकडले आहे. 

 

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , भूम तालुक्यातील  तक्रारदार याचे दोन रेशन दुकान आहेत. संबंधित दुकानदारास तहसिल कार्यलयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी पंडित रामराव राठोड याने  दोन रास्त भाव दुकानांचे तपासणी फॉर्म भरून घेऊन त्यात विनात्रुटी अहवाल वरिष्ठांना पाठविला व त्याचा मोबदला म्हणून पंचा समक्ष प्रथम 6000/-  रुपये लाचेची मागणी  केली.  तडजोडीअंती 5000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व 5000/- रुपये लाच रक्कम  राठोड ने पंचा समक्ष स्वीकारली . भूम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

        ही कारवाई  डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद, विशाल खांबे,अपर पोलीस  अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक ,
सापळा पथक  दिनकर उगलमुगले,  मधुकर जाधव, सचिन शेवाळे, विशाल डोके  यांनी केली. 

 

 

           कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद फोन नंबर 02472 222879 वर किंवा प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंध विभाग  उस्मानाबाद मो.नं.95279 43100 वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement