आष्टी-रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांना सोसावा लागत असून भारतात या युद्धामुळे महागाईचा भडका उडालेला आहे.या देशातील युद्ध तात्काळ थांबवून सर्वसामान्यांना महागाईपासून सुटका मिळायला हवी असे मत भाजप आमदार आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुक्यातील आष्टा (ह.ना.) येथील रस्त्याच्या कामाचे उदघाटन व लोणी येथील ग्रा.प.च्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पनानिमित्त ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मा.आ.साहेबराव दरेकर,प.स.सभापती बद्रीनाथ जगताप,जिल्हा परिषद सदस्य अमर निंबाळकर,जि.प.सदस्य माऊली जरांगे,एकनाथ वाळके,गोपाळ रक्ताटे,सरपंच रेणकू बेल्हेकर,दवा गव्हाणे,प.स.सदस्य सुभाष वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.रविवारी सकाळी ८ वाजता आ.सुरेश धस यांच्या हस्ते जि.स.हिंगणी - टाकळसिंग-वाळूज - जामगाव आष्टा-चिंचपुर रस्तामध्ये सुधारणा करणे रस्ते कामांचा २५०.०० लक्ष खर्च करून रस्त्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अनिल काथवटे,सरपंच सतीष धस ,सरपंच आप्पासाहेब जरे,बाळासाहेब बोराडे,नवल गळगटे, ज्ञानेश्वर पठाडे,सरपंच परिवंत गायकवाड,विनोद रोडे, दत्ता गर्जे, विनायक पठारे, भारत घोडके,संभाजी भांगे उपस्थित होते. तसेच लोणी येथे आ.सुरेश धस यांच्या हस्ते व माजी आ.साहेबराव दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार शेड,वेशीतील ओटे, ग्रामपंचायत कार्यालय,पोकळे वस्ती शाळा,कंम्पाऊंड, सोलर.सार्वजनिक विहिर, पाईपलाईन, भैरवनाथवाडी वस्ती शाळा कंपाऊंड, सोलर,स्मशानभुमी पिव्हींग ब्लॉक,रकटाटेवाडी वस्ती शाळा कंपाऊंड, सोलर,दशक्रिया विधी ठिकाण पिव्हींग ब्लॉक, जि.प.शाळा. सि.सि.टीव्ही.,पिव्हींग ब्लॉ,मागासवर्गीय स्मशानभुमी ठिकाण पिव्हींग ब्लॉक, मुस्लीम स्मशानभुमी वॉल कंम्पाऊंड, मागासवर्गीय वस्ती रस्ते, पिव्हींग ब्लॉक रस्ते सावरे वस्ती शाळा सोलर आदी विविध विकास कामे लोकार्पण करण्यात आले.
आ.धस म्हणाले कि,सध्या ग्रामीण भागामध्ये शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.माञ विजेचा लपंडाव ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबीत आहेत.परंतु शहरीकरणाच्या प्रश्नांवरच जास्तीचा वेळ हा राज्यकर्त्यांचा जात असल्याने ग्रामीण भागातील प्रश्नांवर लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना वेळ पुरत नसल्याचे एकंदरीत चिञ असल्याचे सांगत सद्यस्थितीत सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो आहे. कारण तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.लोखंडाचे भाव देखील गगनाला भिडलेत. यामुळे गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे नवीन घराच्या बांधकामाचे स्वप्न अंधारमय होतानाचे चिञ असल्याचेही आ.धस म्हणाले.